Nagar Diary

अहमदनगर जिल्ह्याचा संक्षिप्त इतिहास


वैभवशाली महाराष्ट्राच्या मध्यभागी वसलेला व समृद्ध ऐतिहासिक, धार्मिक वारसा जोपासणारा आपला अहमदनगर जिल्हा रामायणकाळात अगस्ती ऋषींनी विध्य पर्वत ओलाइन गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर वसाहत केल्याचे व त्यांची व श्रीरामाची भेट झाल्याचे सांगितले जाते

प्रारंभिक

*अहमदनगर जिल्हा हो पूर्वी दंडकारण्य म्हणून ओळखला जाणाऱ्या भागात मोडत होता असे म्हणतात, म्हणून पूर्वीच्या काळी घडलेल्या बन्याच घटनांचा या भूमीशी संबंध जोडला जातो.

  • जटायूकच्चा ही या भागातील पट्टा किल्ल्यावर घडल्याचे सांगतात, श्री अगस्तीची यात्रा आजही अकोल्याशेजारील आगर येथे महाशिवरात्रीस भरते

*पाथर्डी तालुक्यात पांडवकालीन अवशेष दाखवितात पैठण शालिवाहनांची राजधानी प्रतिष्ठान जिल्ह्याला लागूनच असल्यामुळे जिल्ह्यात तत्कालीन अवशेष सापडतात.

  • पुणतांबे शालिवाहनकाळापासूनच प्रसिद्ध आहे. वासे येथे मोहिनीराजाचे प्राचीनप्रसिद्ध मंदिर आहे, संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी येथेच लिहिली.
  • पंधराव्या शतकात अहमदनगरला स्थापन झालेल्या निजामशाहीचा इतिहास सागणाऱ्या नगरचा किल्ला, चादविविचा महाल, अशा अनेक वास्तू आजही व्यवस्थित आहेत.
  • पेशवाईत गाजलेला विठ्ठल सुंदर संगमनेरचा (साडेतीन शाहण्यांपैकी एक), तर त्रिंबकजी डेंगळे निमगाव जाळीचा.

*नाथसंप्रदायी कानिफनाथांची समाधी मढी येथे आहे. संत साईबाबाची शिर्डीला समाधी असल्यामुळे ते तीर्थक्षेत्र बनले आहे.

हे ही वाचा : – नगर ची ही माहिती तुम्हाला माहित आहे का

*अष्टविनायकांपैकी एक सिद्धटेकला आहे.

  • राशिन येथील देवी व दीपमाळ प्रसिद्ध आहे. इ. स. १९४२ चे चले जाव आंदोलन

इ. स. १९४२ च्या चले जाव आंदोलनाच्या काळात सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद, डॉ. पी. सी. घोष, नेहरू इत्यादी राष्ट्रीय नेते नगरमधील भुईकोट किल्ल्यातील कारागृहात कैद होते. ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ हा ग्रंथ नेहरूनी याच किल्ल्यात लिहिला. डॉ. पी. सी. घोष यानी ‘हिस्टरी ऑफ एन्शंट इंडियन ‘सिव्हिलायजेशन’ व मौलाना आझाद यांनी ‘गुबार-ए-खातीर हे ग्रंथ याच शहरात लिहिले.

  • ब्रिटिशांच्या अमलानंतर इंग्रज सैनिक व क्रांतिकारक यांच्यात सतत संघर्ष सुरू होता.

*पारनेर, जामगाव व अकोला भागात कोळी व भिल्ल टोळ्यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते.

हे ही वाचा : – हे नगरकरांसाठी महत्वाचे फोन नंबर सर्वाना नक्की शेअर करा

  • राघोजी भांगरिया या क्रांतिकारकानी १८४७ झाली स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले.
    *१८५७ च्या उठावात भागोजी नाईक यांच्या नेतृत्वाखाली ७००० भिल्लांनी एकवटून संघर्ष केला होता.
  • रावसाहेब पटवर्धन, सेनापती बापट हे स्वातंत्र्य संग्रामातील अग्रणी होते.

*शिंगणापूरला शनीचे जाज्वल देवस्थान असून त्याच्या प्रतापामुळे गावात चोरी होत नाही. या श्रद्धेमुळे तेथील दाराना कड्याकुलपे नाहीत.

पुरातत्व काळ

डेक्कन कॉलेजच्या पुरातत्त्व सर्व्हेक्षणानुसार महाराष्ट्रातील पहिल्या मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथे आढळले आहेत. प्रवरा व गोदावरी नद्याच्या खोऱ्यातील घनदाट अरण्यात मानवी संस्कृतीचे पुरावे व संस्कृतीशी निगडित पुरावे सापडले आहेत. जनस्थान व पंचवटी ही ठिकाणे दंडकारण्यात वसलेली होती. ज्याचा दक्षिणेकडील विस्तार गोदावरी नदीच्या पात्रापर्यंत होता, असे इतिहासकार सांगतात. भारतीय पुरातत्व विभागाने श्रीरामपूर तालुक्यातील दायमाबाद येथे केलेल्या उत्खननानुसार या जिल्ह्यात सिंधू संस्कृती अस्तित्वात असल्याचे सिद्ध झाले आहे.

मध्ययुगीन काळ

पंधराव्या शतकाच्या उत्तरार्धात तत्कालीन बहामनी साम्राज्यातून स्वतंत्र झालेल्या अहमदशहा बहिरी याने सीना नदीकाठी शहर वसविण्यास सुरुवात केली. १४९४ साली अहमदनगर निजामशाहीची राजधानी बनली. त्या काळी या शहराची तुलना कैरोसारख्या शहराशी केली जात असे. अहमदशहा, बुन्हानशहा, चांदबीबी याची कारकीर्द असणारी निजामशाही १६३६ पर्यंत होती.

निजामशाहीला आधार देण्याचे कार्य शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे यांनी केले. छोट्या मुर्तझा निजामशहाला मांडीवर घेऊन नगरचा कारभार त्यांनी केला.

  • मराठेशाही

१७५९ मध्ये नगरचा ताबा पेशव्याकडे आला. १८०३ पर्यंत हा प्रदेश पेशवाई अंतर्गत होता.

इंग्रजी राजवट

सन १८९८ पासून अहमदनगरवर पूर्णपणे इंग्रजाचा अमल होता. १८२२ मध्ये ब्रिटिशांनी अहमदनगर जिल्ह्याची स्थापना केली.

शेयर करा

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.