Nagar Diary

आपले नगर

Ahmednagar : धार्मिक व पर्यटन स्थळे

गोरखनाथ मंदिर डोंगरगण, ता. अहमदनगर डोंगरगण हे अत्यंत सुंदर व रमणीय ठिकाण आहे. अहमदनगर शहरापासून १७ कि.मी. अंतरावर हे ठिकाण आहे. या ठिकाणी गोरक्षनाथगढ या टेकडीवर नवनाथांपैकी एक गोरक्षनाथ यांचे वास्तव्य होते. त्यांचे सुंदर मंदिर या ठिकाणी आहे. मंदिर व मंदिराचा परिसर अत्यंत रमणीय आहे. अहमदनगर किल्ला अहमद निझामशहा याने हा किल्ला बांधला. भारतातील अभेद्य किल्ल्यांमध्ये या किल्ल्याची गणना होते. किल्ल्याचा आकार अंडाकृती आहे. भिंतींची उंची १८ मीटर इतकी आहे. किल्ल्याला २४ बुरूज आहेत. किल्ल्याच्या संरक्षणप्रणालीचा महत्त्वाचा भाग म्हणजे ३० मीटर रुंदीचा व ४ ते ६ मीटर खोलीचा खंदक आहे. किल्ल्याचे बांधकाम अत्यंत भक्कम आहे. अनेक सत्तांच्या ताब्यातून हा किल्ला गेलेला आहे. राष्ट्रीय चळवळीतील नेत्यांना याच किल्ल्यात कैद करण्यात आले होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा हा किल्ला साक्षीदार आहे. विशाल गणपती माळीवाडा अहमदनगर शहराचे ग्रामदैवत असलेले हे प्राचीन गणेशस्थान आहे. या ठिकाणी श्री गणेशाची ११ फूट उंचीची विशाल मूर्ती आहे. मंदिराचे बांधकाम वैशिष्ट्यपूर्ण आहे. श्री साईबाबा मंदिर, शिर्डी, ता. राहता भारतातील सर्वधर्माच्या भक्तांचे श्रद्धास्थान असलेले साईबाबा यांचे मंदिर शिर्डी या ठिकाणी आहे. तीर्थक्षेत्र व्यवस्थापनाचा आदर्श म्हणून या ठिकाणच्या मंदिर व्यवस्थापनाकडे पाहिले जाते. साईबाबांचे वास्तव्यस्थान शिर्डी हे होते.

Read More
आपले नगर

धार्मिक व पर्यटन स्थळे

धार्मिक व पर्यटन स्थळे १. शनि मंदिर, शनि शिंगणापूर ता. नेवासा नेवासा तालुक्यात अहमदनगरपासून ३५ कि. मी. अंतरावर हे शनीचे जागृत देवस्थान आहे. येथे शनिदेवाची ५ फूट ९ इंच उंचीची स्वयंभू मूर्ती आहे जी एक संगमरवरी चौथन्यावर उभी आहे. या ठिकाणचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे मंदिर नाही अथवा मूर्तीवर कुठलेही छत अथवा छाया नाही. सुमारे ४००० लोकसंख्या असलेल्या या गावात कोणत्याही घरास दरवाजा नाही. इतकेच नाही तर कपाटे, सुटकेस इत्यादीसही कुलूप नाही. दर शनि अमावास्येस या ठिकाणी भाविक दर्शनासाठी मोठ्या संख्येने येतात. २. दत्तमंदिर, देवगड, ता. नेवासा नेवासापासून थोड्याच अंतरावर हे प्रसिद्ध रमणीय दत्त क्षेत्र आहे. मंदिराच्या भोवती सुंदर बाग तयार करण्यात आलेली आहे. अत्यंत हिरवागार असलेला हा परिसर पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनत आहे. या मंदिराच्या पाठीमागून प्रवरा नदी वाहते. अहमदनगर-औरंगाबाद मार्गावर नगरपासून ७० कि. मी. अंतरावर हे ठिकाण आहे. थोर संत किसनगिरी महाराज यांचे हे पवित्र स्थान आहे. ३. संत ज्ञानेश्वर मंदिर, नेवासे नेवासे येथील करवीरेश्वराच्या मंदिरात संत ज्ञानेश्वरांनी ‘भावार्थदीपिका’ हा श्रीमद्भगवतीचे मराठीत निरुपण करणारा ओवीबद्ध ग्रंथ लिहिला. यालाच आपण ‘ज्ञानेश्वरी’ म्हणतो. ज्या खांबाला टेकून ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी लिहिली ते खांब अजूनही नेवासे गावात आहे, असे भाविक सांगतात. ४. मोहिनीराज मंदिर, नेवासे नेवासे येथे मोहिनीराजाचे एक प्राचीन मंदिर आहे. पौराणिक वर्णनाप्रमाणे भस्मासुर या उन्मत्त दैत्याचा निःपात करण्यासाठी श्रीविष्णूने मोहिनीचे रूप घेतले व भस्मासुराचा वध केला. ते ठिकाण नेवासे असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. प्राचीन मंदिर हा स्थापत्यकलेचा उत्तम नमुना आहे.

Read More
आपले नगर

अहमदनगर जिल्ह्याचा संक्षिप्त इतिहास

अहमदनगर जिल्ह्याचा संक्षिप्त इतिहास वैभवशाली महाराष्ट्राच्या मध्यभागी वसलेला व समृद्ध ऐतिहासिक, धार्मिक वारसा जोपासणारा आपला अहमदनगर जिल्हा रामायणकाळात अगस्ती ऋषींनी विध्य पर्वत ओलाइन गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर वसाहत केल्याचे व त्यांची व श्रीरामाची भेट झाल्याचे सांगितले जाते • प्रारंभिक *अहमदनगर जिल्हा हो पूर्वी दंडकारण्य म्हणून ओळखला जाणाऱ्या भागात मोडत होता असे म्हणतात, म्हणून पूर्वीच्या काळी घडलेल्या बन्याच घटनांचा या भूमीशी संबंध जोडला जातो. *पाथर्डी तालुक्यात पांडवकालीन अवशेष दाखवितात पैठण शालिवाहनांची राजधानी प्रतिष्ठान जिल्ह्याला लागूनच असल्यामुळे जिल्ह्यात तत्कालीन अवशेष सापडतात. *नाथसंप्रदायी कानिफनाथांची समाधी मढी येथे आहे. संत साईबाबाची शिर्डीला समाधी असल्यामुळे ते तीर्थक्षेत्र बनले आहे. हे ही वाचा : – नगर ची ही माहिती तुम्हाला माहित आहे का *अष्टविनायकांपैकी एक सिद्धटेकला आहे. इ. स. १९४२ च्या चले जाव आंदोलनाच्या काळात सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद, डॉ. पी. सी. घोष, नेहरू इत्यादी राष्ट्रीय नेते नगरमधील भुईकोट किल्ल्यातील कारागृहात कैद होते. ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ हा ग्रंथ नेहरूनी याच किल्ल्यात लिहिला. डॉ. पी. सी. घोष यानी ‘हिस्टरी ऑफ एन्शंट इंडियन ‘सिव्हिलायजेशन’ व मौलाना आझाद यांनी ‘गुबार-ए-खातीर हे ग्रंथ याच शहरात लिहिले. *पारनेर, जामगाव व अकोला भागात कोळी व भिल्ल टोळ्यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते. हे ही वाचा : – हे नगरकरांसाठी महत्वाचे फोन नंबर सर्वाना नक्की शेअर करा *शिंगणापूरला शनीचे जाज्वल देवस्थान असून त्याच्या प्रतापामुळे गावात चोरी होत नाही. या श्रद्धेमुळे तेथील दाराना कड्याकुलपे नाहीत. ● पुरातत्व काळ डेक्कन कॉलेजच्या पुरातत्त्व सर्व्हेक्षणानुसार महाराष्ट्रातील पहिल्या मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथे आढळले आहेत. प्रवरा व गोदावरी नद्याच्या खोऱ्यातील घनदाट अरण्यात मानवी संस्कृतीचे पुरावे व संस्कृतीशी निगडित पुरावे सापडले आहेत. जनस्थान व पंचवटी ही ठिकाणे दंडकारण्यात वसलेली होती. ज्याचा दक्षिणेकडील विस्तार गोदावरी नदीच्या पात्रापर्यंत होता, असे इतिहासकार सांगतात. भारतीय पुरातत्व विभागाने श्रीरामपूर तालुक्यातील दायमाबाद येथे केलेल्या उत्खननानुसार या जिल्ह्यात सिंधू संस्कृती अस्तित्वात असल्याचे सिद्ध झाले आहे. • मध्ययुगीन काळ पंधराव्या शतकाच्या उत्तरार्धात तत्कालीन बहामनी साम्राज्यातून स्वतंत्र झालेल्या अहमदशहा बहिरी याने सीना नदीकाठी शहर वसविण्यास सुरुवात केली. १४९४ साली अहमदनगर निजामशाहीची राजधानी बनली. त्या काळी या शहराची तुलना कैरोसारख्या शहराशी केली जात असे. अहमदशहा, बुन्हानशहा, चांदबीबी याची कारकीर्द असणारी निजामशाही १६३६ पर्यंत होती. निजामशाहीला आधार देण्याचे कार्य शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे यांनी केले. छोट्या मुर्तझा निजामशहाला मांडीवर घेऊन नगरचा कारभार त्यांनी केला. १७५९ मध्ये नगरचा ताबा पेशव्याकडे आला. १८०३ पर्यंत हा प्रदेश पेशवाई अंतर्गत होता. • इंग्रजी राजवट सन १८९८ पासून अहमदनगरवर पूर्णपणे इंग्रजाचा अमल होता. १८२२ मध्ये ब्रिटिशांनी अहमदनगर जिल्ह्याची स्थापना केली.

Read More

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.